श्वास देवराई : एक समृद्ध जैवविविधता व स्वर्गीय प्रवास.............
श्वास देवराई : एक समृद्ध जैव विविधता व स्वर्गीय प्रवास.............
आज आपल्याला अनेक प्रश्न आहेत देवराईच्या बाबतीत तिचे संवर्धन व जतन का करावे ?
आज आपणाला देवराई ची गरज का आहे व त्याचे आपल्या जीवनामध्ये व पर्यावरणामध्ये काय फायदे आहेत. हे आपण जाणून घेऊया !
कारण सृष्टी ही मनुष्याने निर्माण केली नाही आहे व ते त्याला जमणार नाही आपण फक्त उपभोक्ता आहोत व त्यामुळे आपले हे कर्तव्य आहे, जसे आपण उपभोगले आहे तसेच आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी निसर्ग राखून ठेवून त्यांच्या स्वाधीन केले पाहिजे.
आई आणि झाड हे दोन्ही एकच आहे कारण देण्याचा गुणधर्म या दोघांमध्ये प्रचंड आहे.
अथर्व वेदामध्ये भूमीला आपण आई मानतो तर निसर्गाला आपण दैवत मानतो तर ह्याच निसर्गाचे हृदय म्हणजे देवराई आहे व त्याचे संवर्धन व पूजन आपल्याला केले पाहिजे.
हिंदू संस्कृती मध्ये आपल्या सण-वारांचे नियोजन हे निसर्गाला धरूनच केलेले आहे पूर्वी आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रानभाज्यांचे व औषधांचे सेवन करत होतो त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती व आपले स्वास्थ हे सदृढ होते परंतु आता ही संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. कारण ह्या सर्व वनस्पतीचे संगोपन आपण कधी केलेच नाही. व ह्या सर्वांचे मुबलक प्रमाणात उपलब्धी ही देवराई मध्ये बघण्यास मिळते.
देवराई ही विविध नावाने प्रसिद्ध आहे देवरहाटी , देववन , राई इतर. देवराई ही ही एक जैवविविधतेचा जिवंत झरा आहे व देवराई मध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे, गवते, झुडुपे, कीटक, फुलपाखरे, पतंग, साप, निशाचर प्राणी इत्यादीचा वावर आढळतो.
एकूण जैवविविधतेच्या 35% जैवविविधता ही फक्त देवराई मध्ये आढळते त्यासाठी देवराईचे संगोपन व जतन करणे खूप महत्त्वाचे आहे आज आपण शहरात राहतो व शहरांच्या लगत देवराई चे अस्तित्व हे खूप दुर्मिळ आहे त्यामुळे आपल्यालाही परिसंस्था अजून पर्यंत समजलेली नाही.
सध्या होणारे हवामानाचे बदल व जागतिक तापमान वाढ हे सध्या प्रचंड मोठे संकट आपल्यासमोर आहे. व अश्या भविष्यातील निसर्ग प्रकोपाना आळा घालायचा असेल तर आताच त्या दिशेने आपल्याला वाटचाल केली पाहिजे.
जर भविष्यामध्ये सर्व जंगल नष्ट झाले तर ह्याच देवराया आपल्यासाठी जीन बँक व सीड बँक चे काम करतील, कारण आपल्या सभोवतालच्या जंगलांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याच्या बाजूची किंवा त्यामधील देवराई चा अभ्यास करावा. त्यामुळे आपल्याला अंदाज येईल इथे कोणत्या प्रकारच्या जंगलाचे अस्तित्व होते, व त्याचीच ठेवण ही देवराई मध्ये उत्तम प्रकारे केलेली असते, त्याचा पुढे आपणास अभ्यासासाठी व संशोधनासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे यांचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज बनली आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना पुढे येऊन तिचे महत्त्व समजून ही संकल्पना पुढच्या पिढीकडे कशी पोहोचेल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे व तिचे जतन केले पाहिजे.
ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे परेलमध्ये केलेली मानव निर्मित देवराई अशी संकल्पना ब्रीदिंगरूट्स या संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. ह्यामध्ये देवराई चा सखोल अभ्यास करून तिची रचना व तिचे नैसर्गिक मूळ रूप साधण्याचा एक प्रयत्न केलेला आहे.
देवराई ही एक निसर्गाने निर्माण केलेली बीजे स्त्रोत आहेत कारण यामध्ये हजारो वर्ष जुनी झाडे आढळतात, जगामध्ये प्रथम देवराई चा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने हा भारतामध्ये झाला व भारता पासूनच देवरायांच्या अभ्यासाची सुरुवात झाली. आजही आपण आपली परंपरा जपली पाहीजे व त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले पाहिजे.
देवराई हा एक अखंड जलस्त्रोत आहे कारण मुख्यता बहुदा नद्यांचा उगम ओढे झरे यांचा उगम हा देवराई मधूनच होतो देवराई ही गावाच्या बहुदा उंच भागावर असते त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे गावामध्ये बाराही महिने पाणी राहते जर आपल्याला जलसंधारण करायचे असेल, तर त्याआधी आपणास देवराईचे संवर्धन केले पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत.
देवरायांचा उगम कसा झाला असेल याबद्दल वेगवेगळ्या अख्यायिका आहेत कदाचित पंचमहाभूत बद्दल आदर किंवा भीती मधून देवराईची निर्मिती झाली असेल किंवा आपल्या पूर्वजांनी संवर्धनासाठी देवाच्या नावाने जंगलांचे काही भाग संरक्षित करून ठेवले असावे कारण मनुष्य हा देवाला घाबरून तरी देवराईचे व पर्यावरणाचे संरक्षण करेल याबद्दल त्यांना खात्री होती. कारण मनुष्य आपल्या लोभा पोटी या जंगलांचा नाश करेल याची त्यांना खात्री होती व त्यामुळेच देवराई ची निर्मिती झाली असावी.
प्रत्येक देवराई मध्ये एखादे असे झाड असते जे संपूर्ण परिसंस्था जतन करून ठेवते व त्यालाच key Stone species असे सुद्धा म्हणतात.
तर अशा दुर्मिळ व जुन्या वृक्षांचा अधिवास आपणास देवराईत मध्ये पहावयास मिळतो त्यामुळे देवराई चे संवर्धन व जतन आपण केलेच पाहिजे.
मी जयेश लांबोर ,
seeds & Biodiversity conservation Expert
आणि Breathingroots या संस्थेचा founder.
Nature restore करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम केले पाहिजे.
माझा संकल्प असा आहे की येणाऱ्या पाच वर्षात पाचशे श्वास देवराई बनवण्याचा माझा ध्यास आहे व त्यामधील पहिली श्वास देवराई ही आपल्या परेलला नायगाव येथे Breathingroots च्या मार्फत बनवण्यात आली आहे. ह्या मार्फत आपण पण नैसर्गिक सुबकतेचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही केला आहे.
परंतु अजून आपल्याला खूप खूप काम करायचे आहे व त्यासाठी मला तुम्हा सर्वांची मदत हवी आहे.
चला तर मग निसर्गामध्ये जाऊया व निसर्गाशी एक नातं जोडुया..
तर यावर्षी आपण एक आगळीवेगळी प्रतिज्ञा घेऊया या दसऱ्याला आपट्याचं पान तोडून देण्यापेक्षा आपट्याची झाड आपण आपल्या प्रियजनांना नातेवाईकांना व मित्रांना देऊया आणि निसर्ग वाचवण्याच्या या चळवळीमध्ये Breathingroots सोबत सहभागी होऊया...
वा
ReplyDeleteखूपच सुंदर
Very Nice Jayesh
ReplyDeleteKhoop chan 👌🏻👍
ReplyDeletekhoop chan 👌🏻👍
ReplyDeleteKhupach chhan
ReplyDeleteखूप छान. I stay in Wadala and would love to visit your baug in Parel. I am part of Osm
ReplyDeleteKhup chan sir
ReplyDelete